पडळ, गुरसाळे येथे कोरोना सेंटर सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST2021-04-23T04:41:00+5:302021-04-23T04:41:00+5:30

वडूज : ‘खटाव तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या लक्षात घेता, गुरसाळे व पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तातडीने कोरोना सेंटर सुरू केले ...

Padal will start Corona Center at Gursale | पडळ, गुरसाळे येथे कोरोना सेंटर सुरू करणार

पडळ, गुरसाळे येथे कोरोना सेंटर सुरू करणार

वडूज : ‘खटाव तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या लक्षात घेता, गुरसाळे व पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तातडीने कोरोना सेंटर सुरू केले जाणार आहे. पुसेगाव, खटाव, वडूज, औंध, मायणी कोरोना सेंटरला लागणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू,’ असे माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, माजी सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, नंदकुमार मोरे, सदस्य संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिंदे म्हणाले, ‘कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. वाढत्या संसर्गावर मात करण्यासाठी शासन, प्रशासन यंत्रणेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. लोकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सहकार्य करणे गरजेचे आहे. वडूज, पुसेगाव, खटाव, मायणी येथे सध्या कोविड सेंटर सुरू आहेत. मात्र, कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येमुळे जिल्हास्तरावरील कोविड सेंटरवर ताण येत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तालुका पातळीवरच नव्या कोविड सेंटरचा प्रस्ताव करावा. कलेढोणच्या कुटिर रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूज शहराच्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. औंध, पुसेसावळी येथे कोविड सेंटरचा प्रस्ताव करावा. पुसेगाव, खटाव

येथील कोविड सेंटरला अखंडित वीज पुरवठा करावा.

उपाध्यक्ष प्रदीप विधाते म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पडळ व गुरसाळे येथे बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने

योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच भविष्यकालीन उपाययोजना म्हणून पुसेगाव येथील पब्लिक स्कूल, खटाव येथे मुलांचे वसतिगृह, औंध, मायणी याठिकाणी ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी स्वागत केले. सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांनी प्रास्ताविक केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली.

२२वडूज

वडूज येथे तालुकास्तरीय कोरोना आढावा बैठकीत बोलताना आमदार शशिकांत शिंदे. यावेळी प्रदीप विधातेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)

---------------------------------------

Web Title: Padal will start Corona Center at Gursale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.