ठाण्यातील आयुक्त हल्लाप्रकरणी पाचगणी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:09+5:302021-09-02T05:25:09+5:30
पाचगणी : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाचगणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम ...

ठाण्यातील आयुक्त हल्लाप्रकरणी पाचगणी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
पाचगणी : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाचगणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
याबाबत माहिती अशी की, ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी फेरीवाले अतिक्रमण हटाव मोहिमेत फेरीवाल्याकडून हल्ला झाला होता. यामध्ये हाताची तीन बोटे कापली गेली, तर सोबतच्या अंगरक्षकाचे एक बोट छाटले गेले. या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी पाचगणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन देत काम बंद करून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
यावेळी पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सोबत ३१पाचगणी
पाचगणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी मुख्याधिकारी गिरीष दापकेकरही उपस्थित होते. (छाया : दिलीप पाडळे)