पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून गरजूंना दूध वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:09+5:302021-09-12T04:45:09+5:30

फलटण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामान्य कुटुंबाला सकस व पौष्टिक आहार मिळावा, या हेतूने पु. ना. गाडगीळ अँड ...

P. No. Distribution of milk to the needy from Gadgil & Sons | पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून गरजूंना दूध वाटप

पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून गरजूंना दूध वाटप

फलटण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामान्य कुटुंबाला सकस व पौष्टिक आहार मिळावा, या हेतूने पु. ना. गाडगीळ अँड सन्स, पुणे यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने दि. १४ मे ते दि. ३१ ऑक्टोबरदरम्यान अनेक गावांमध्ये दूध वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून, प्रामुख्याने मुलांना दुधाचा लाभ होईल, असा प्रयत्न होत आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पु. ना. गाडगीळ अँड सन्स, पुणे, सद्गुरू हरिबुवा शिक्षण संस्था, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने फलटण नगर परिषदेच्या सहकार्याने गरजू कुटुंबांना दूध वाटप उपक्रमाचा प्रारंभ समारंभपूर्वक करण्यात आला. आगामी १० दिवस प्रतिदिन ३०० कुटुंबांना १ लिटर याप्रमाणे हे दूध वितरण करण्यात येणार आहे, दूध वितरणप्रसंगी पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक अमित मोडक, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, पाणीपुरवठा समितीच्या सभापती ॲड. मधुबाला भोसले, पी. एम. डी. मिल्कचे संस्थापक हणमंतराव मोहिते, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक शेखर जगताप, संतकृपा मिल्कचे अध्यक्ष विलासराव नलवडे, नरसिंग शिंदे, पी. एन. गाडगीळ अँड सन्स फलटण शाखा प्रमुख नीलेश इथापे, सद्गुरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, सुदर्शन वाघ, डॉ. नाथा भोसले यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, फलटण तालुक्यातील फलटण, सांगवी गावात उपक्रम राबविण्यात येत आहे.

सद्गुरू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव कालावधीत दूध वितरण दररोज ३०० कुटुंबांना करण्यात येणार असून, त्यानंतर मलटण भागातील कुटुंबासाठी उपक्रम महिनाभर राबविण्यात येणार आहे. (वा. प्र.)

Web Title: P. No. Distribution of milk to the needy from Gadgil & Sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.