विडणीत कोरोनाचा उद्रेक वाढू लागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:36+5:302021-04-04T04:40:36+5:30
कोळकी : विडणीमध्ये आठवड्यात अठरा जणांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्याने विडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून विडणी ...

विडणीत कोरोनाचा उद्रेक वाढू लागला!
कोळकी : विडणीमध्ये आठवड्यात अठरा जणांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्याने विडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून विडणी गावठाण बझर झोन तर दहाबिघे वस्ती कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
विडणीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव वाढत असून, या आठवड्यात तब्बल अठरा जणांंचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून विडणी गावठाण बफर झोन करण्यात आले आहे तर दहाबिघे वस्तीवर एकाच कुटुंबातील १३ जणांंचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणचा परिसर ग्रामपंचायतीने बंद करून परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असल्याचे सरपंच रुपाली अभंग यांनी सांगितले. दरम्यान, विडणी गावात ‘होम टू होम’ सर्व्हे आशा वर्कसकडून करण्यात येत असून, सर्दी, ताप, घसा आदी लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य केंद्रास संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन शेंडे यांनी केले आहे.
०३विडणी
फोटो : विडणी येथील कोरोना बाधित कुंटुबातील दहाबिघे वस्ती येथे प्रशासकीय दक्षता कमिटीने माहिती घेतली.
(छाया - सतीश कर्वे)