वगरेवस्तीत ‘व्हरांडा शाळा’ एक स्तुत्य उपक्रम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:43 IST2021-09-23T04:43:56+5:302021-09-23T04:43:56+5:30

वरकुटे-मलवडी : वगरेवस्ती (ता. माण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने कोरोनामध्ये मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी अनेक ऑनलाईन उपक्रम राबविले. विद्यार्थी ...

In other words, 'Veranda School' is a commendable activity ... | वगरेवस्तीत ‘व्हरांडा शाळा’ एक स्तुत्य उपक्रम...

वगरेवस्तीत ‘व्हरांडा शाळा’ एक स्तुत्य उपक्रम...

वरकुटे-मलवडी : वगरेवस्ती (ता. माण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने कोरोनामध्ये मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी अनेक ऑनलाईन उपक्रम राबविले. विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने, सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने व पालकांच्या संमतीने ‘व्हरांडा शाळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून इतर शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशासह राज्यातील शिक्षण व्यवस्था हतबल झाली आणि खेडोपाड्यात वाडी-वस्तीत चिमुकल्यांना प्रत्यक्षात शाळेत जाऊन आनंददायी शिक्षण घेणे बंद झाले. शाळेतील सामुदायिक शिक्षण घेेण्याचा मार्ग बंद झाला आणि शासनानेे सुरू केेेले ऑनलाईन शिक्षण. मग काय...शिक्षक शाळेत आणि मुलं घरी. मोबाईलवरच्या शिक्षणाने मुलांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यामध्ये सुशिक्षित पालकांच्या मुलांनी ऑनलाईन शिक्षणात प्रगती केली; मात्र ज्या मुलांचे पालक शेतकरी, शेतमजूर आहेत, ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांच्यासाठी मुलांचे ऑनलाईन शिक्षण हे खूप महागात पडले. कोरोनामुळे रोजगार हरवलेल्या पालकांना स्मार्टफोनसाठी हजारो रुपये खर्चावे लागले. यामुळे घरच्या संसारापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठीचाच खर्च भरमसाठ वाढला. यावर पर्याय म्हणून माण तालुक्यातील वगरेवस्ती शाळेचे उपक्रमशील आदर्श शिक्षक शिवाजी शिंगाडे यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांच्या संमतीने व्हरांडा शाळा सुरू करून प्रगती साधत, वस्तीवरील मुलांमध्ये नवचेतना जागवली आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत असून, नेहमीच वेगळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे आदर्श शिक्षक शिवाजी शिंगाडे यांच्या शिक्षणप्रणालीचे महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे, माजी सरपंच विजयकुमार जगताप, उपसरपंच मारुती मदने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पुकळे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. व्हरांडाशाळा उपक्रम राबविण्यासाठी त्यांचे सहशिक्षक शिक्षक रघुनाथ जगताप यांचे विशेष योगदान मिळाले आहे.

Web Title: In other words, 'Veranda School' is a commendable activity ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.