शिवसागर जलाशयाचे शंभूराज देसाईंच्या हस्ते ओटी भरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:52+5:302021-09-13T04:38:52+5:30
कोयनानगर : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपूजन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. यावेळी ...

शिवसागर जलाशयाचे शंभूराज देसाईंच्या हस्ते ओटी भरण
कोयनानगर : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपूजन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. यावेळी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार, तहसीलदार योगेश टोम्पे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, सदानंद साळुंखे, भरत साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, आशिष जाधव, उपविभागीय अभियंता, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, अभिजित पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये शंभर टीएमसीहून अधिक पाणीपातळी झाल्यानंतर अथवा धरणाच्या वक्रदरवाजातून पाण्याचा विसर्ग करताना दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची ओटी भरुन पूजन करण्यात येते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते याठिकाणी विधिवत पूजा करुन कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे खणा-नारळाने ओटीभरण करण्यात आले.
१०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात शुक्रवारी दुपारी शंभर टीएमसी पाणीसाठा झाला होता. चार दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. धरणातील पाणीसाठा १०४ टीएमसी इतका झाला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी धरणाचे सहा वक्रदरवाजे एक फुटाने उघडून सुमारे दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला आहे.
१२ कोयना डॅम
कोयना धरणातील पाण्याचे रविवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ओटीभरण करण्यात आले. यावेळी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार, तहसीलदार योगेश टोम्पे उपस्थित होते.