कऱ्हाड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

By Admin | Updated: April 13, 2017 12:56 IST2017-04-13T12:56:52+5:302017-04-13T12:56:52+5:30

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती : कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार

Organizing Mango Festival at Karhad | कऱ्हाड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

कऱ्हाड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड, दि. १३ : राज्यात हापूस आंब्याला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी पणन व स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती विभागामार्फत खारघर व कऱ्हाड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

कोकणातील आंबा उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी औरंगाबाद, नाशिक, पुणे, येरवडा या ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंबा महोत्सव

कऱ्हाड
दिनांक २0 ते २५ एप्रिल
बैलबाजार कऱ्हाड

खारघर
येथे दिनांक १२ ते १६ मे
सेक्टर- १२ मैदान,
गोखले हायस्कूल, खारघर

Web Title: Organizing Mango Festival at Karhad