दलित महासंघाच्यावतीने अण्णा भाऊ साठे जयंतीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:00+5:302021-08-29T04:37:00+5:30
कऱ्हाड : दलित महासंघाच्यावतीने सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दलित महासंघाच्यावतीने अण्णा भाऊ साठे जयंतीचे आयोजन
कऱ्हाड : दलित महासंघाच्यावतीने सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कऱ्हाड येथे मंगळवार, दि. ३१रोजी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती दलित महासंघाचे सरचिटणीस प्रकाश वायदंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. रवींद्र पवार यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी उत्तमराव दिघे व समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे उपस्थित राहणार आहेत.
कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शालन वाघमारे यांना यावेळी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे ‘समता पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते व बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष रामराव दाभाडे यांनी केले आहे.