शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
3
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
4
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
5
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
6
SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र
7
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
8
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
9
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
10
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
11
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
12
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
13
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
14
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
15
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
16
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
17
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
18
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
19
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
20
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

केंद्र सरकारच्या विरोधात २१ जुलैला कराडमध्ये 'मूकमोर्चा'चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 16:19 IST

भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे, हा एक अनुत्तरीत प्रश्न

कऱ्हाड : सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई करीत ईडीची चौकशी सुरु केली आहे. त्याविरोधात कराड तालुका काँग्रेसच्या वतीने कराड शहरामध्ये २१ जुलै रोजी मूकमोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, नानासो पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, राजेंद्र यादव, शहाजी पाटील, मोहन शिंगाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मनोहर शिंदे म्हणाले, सध्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावून त्या नेत्याची व त्यांच्या कुटुंबाची मानसिकता खराब करण्याचे कारस्थान भाजप सरकारकडून केले जात आहे. परंतु आम्ही काँग्रेस विचारांचे पाईक असे होऊ देणार नाही म्हणूनच २१ जुलै रोजी कराड शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून मूकमोर्चा काढला जाईल.इंद्रजित चव्हाण म्हणाले, इंधनाची भाववाढ असो, नोटबंदी - जीएसटीच्या अंमलबजावणीचा निर्णय असो किंवा शेतकरी विरोधी कायदे असोत हा सर्व मनमानी कारभार जनतेसमोर आणणारे विरोधक यांना चौकशीमध्ये अडकविले जात आहे आणि त्यामध्ये जे शरण येतील, त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला जात आहे, अशी भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे, हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार