‘माझा बाप्पा, माझी आरास’ स्पर्धेचे ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:00+5:302021-09-12T04:45:00+5:30
सातारा : ‘लोकमत सखी मंच’तर्फे खास गणेशोत्सवानिमित्ताने ‘माझा बाप्पा, माझी आरास’ या गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...

‘माझा बाप्पा, माझी आरास’ स्पर्धेचे ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजन
सातारा : ‘लोकमत सखी मंच’तर्फे खास गणेशोत्सवानिमित्ताने ‘माझा बाप्पा, माझी आरास’ या गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सर्व सखी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपले गौरी गणपती आरास सजावटीचे फोटो लोकमत इव्हेंटस् कोल्हापूर-सांगली-सातारा या फेसबुक पेजवर शेअर करण्यापूर्वी तुम्ही पेज लाईक केलेले असावे.
ही स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठी मर्यादित आहे. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. एक स्पर्धक एकच फोटो पाठवू शकते. फोटो पोस्ट करताना पोस्टमध्ये संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, शहर लिहून पाठवणे अनिवार्य असेल. १० सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत या स्पर्धेसाठी मिळालेल्या फोटोवर लाईक्स व सहभाग ग्राह्य धरला जाईल. २० सप्टेंबरनंतर लोकमत इव्हेंटस् कोल्हापूर-सांगली-सातारा या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येईल. स्पर्धेसंदर्भातील सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. स्पर्धेत एकूण मिळालेल्या लाईक्सनुसार पाच व परीक्षणानुसार पाच विजेते निवडण्यात येतील. या विजेत्या स्पर्धकांना पुढीलप्रमाणे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक चांदीची गजांतलक्ष्मीची फ्रेम, द्वितीय क्रमांक लक्ष्मी-गणपती चांदीची फ्रेम, तृतीय क्रमांक चांदीची गणपती फ्रेम तसेच ४ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आपल्या गौरी गणपती आरास/सजावटीचा फोटो फेसबुक पेजवर पोस्ट करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.
चौकट
इम्प्रेशन ब्युटी सलोन ॲण्ड इन्स्टिट्यूट
सातारा येथे पंचवीस वर्षांची परंपरा असलेले इम्प्रेशन प्लस सलोन येथे महिलांसाठी ॲडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्सेस, थ्रेडिंग, ॲडव्हान्स आयब्रो कलरिंग, व्हॅक्सिंग, बेसिक ॲन्ड ॲडव्हान्स हेअर कट, हेअर ट्रीटमेंट, हेअर कलरिंग, हेअरस्पा, ॲडव्हान्स स्कीन ट्रीटमेंट, ॲडव्हान्स ॲण्ड बेसिक फेशिअल, ईअर परसिंग, पेडिक्युअर, मेनिक्युअर, अशाप्रकारच्या खात्रीशीर सर्व्हिस उपलब्ध आहे.
चौकट
गिफ्ट पार्टनर श्री गणेश ज्वेलर्स
सातारा येथील सोन्या-चांदी खरेदीमधील विश्वसनीय आणि खात्रीशीर नाव म्हणजे श्री गणेश ज्वेलर्स. सोन्या-चांदीतील असंख्य व्हरायटी तसेच नावीन्यपूर्ण दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण.