जिंतीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थाही सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:20+5:302021-08-27T04:42:20+5:30
मलकापूर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थाही सरसावल्या असून येथील मंगलमूर्ती पतसंस्थेने पाटण तालुक्यातील जिंती येथील ५० कुटुंबातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू ...

जिंतीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थाही सरसावल्या
मलकापूर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थाही सरसावल्या असून येथील मंगलमूर्ती पतसंस्थेने पाटण तालुक्यातील जिंती येथील ५० कुटुंबातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा आधार देत सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सागर यादव, सुनील भोसले, अभिजित काळे, दशरथ बेबले, अजित दुर्गावळे, जयवंत मोटे, विनायक पाटील, गौस भालदार, अरविंद पटेल, धनाजी बोडरे, अमोल जंगम, जनार्दन जाधव, वैभव यादव, संतोष साळुंखे, अरविंद निकणके, सुरेश शिंदे, नलवडे, नीलेश पाटील, अनिल इंगळे, नयन पाटील, शशिकांत पायमल्ले यांनी सहभाग घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव म्हणाले, ‘कऱ्हाड व पाटण तालुक्यातील बहुतांशी गावात पूर परिस्थितीचा फटका बसला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून अशा बाधित गावातील गरजूंना तातडीचे मदत गरजेची आहे. हे ओळखून संस्थेच्या माध्यमातून जिंती येथील ५० कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला आहे. आम्हाला या कार्यात संस्थेच्या खातेदार, सभासद व हितचिंतकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली.
फोटो
जिंती ता. पाटण येथील पन्नास कुटुंबाला मंगलमूर्ती पतसंस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला आहे.