अवयवदान प्रतिज्ञा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:00+5:302021-09-02T05:23:00+5:30

सातारा : कोमल न्यू लाईफ फाउंडेशनतर्फे अवयव दान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १ सप्टेंबर रोजी कोमल पवार गोडसे यांचा स्मृती ...

Organ donation pledge day | अवयवदान प्रतिज्ञा दिन

अवयवदान प्रतिज्ञा दिन

सातारा : कोमल न्यू लाईफ फाउंडेशनतर्फे अवयव दान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १ सप्टेंबर रोजी कोमल पवार गोडसे यांचा स्मृती दिवस अवयव दान प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. धीरज गोडसे यांनी दिली.

भारतातील पहिले यशस्वी हृदय आणि प्रत्यार्पण झालेली मुलगी म्हणून कोमल पवार परिचित होती. समाजात अवयवदान चळवळ राबविण्यासाठी २८ डिसेंबर २०१७ रोजी कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची स्थापना केली. यामार्फत अवयव दान जनजागृती प्रत्यारोपण संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले सुमारे दीडशेहून अधिक कार्यक्रम घेऊन अवयवदान चळवळीस घराघरात पोहोचवली. तीनशेहून अधिक हृदय प्रत्यारोपण ९०० हून अधिक किडनी लिव्हर प्रत्यारोपण यासाठी काम केले. गतवर्षी एक सप्टेंबरला कोमल यांना ऑर्गन रिजेक्शन आल्याने हैदराबादला हलवण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. कोमल यांचे स्वप्न त्यांचे पती धीरज गोडसे ताकतीने पुढे नेत आहेत. अवयव दानात अतुलनीय योगदानाबद्दल १ सप्टेंबर कोमल पवार गोडसे यांचा स्मृती दिवस अवयवदान प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा करणार असल्याचे धीरज गोडसे यांनी सांगितले.

Web Title: Organ donation pledge day