शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडावरील अतिक्रमणाला विरोध; पण राज्य शासन अपयशी - जयंत पाटील 

By नितीन काळेल | Updated: July 17, 2024 23:24 IST

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल राहील 

सातारा : विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीला राहील. तिन्ही पक्षात चर्चा करुन जागा वाटपाचा निर्णय होईल. सातारा जिल्ह्यातही मागीलपेक्षा चांगली स्थिती आघाडीची राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर विशाळगडावरील अतिक्रमाणाला विरोध आहे. पण, पावसाळ्यात हे काम केले. यामध्ये राज्य शासन अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.             येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सत्यजितसिंह पाटणकर आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा दाैरा सुरू केला आहे. 

पहिला टप्पा २८ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न राहील. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बळ आणि पैशाचा वापर झाला. त्यातच पिपाणी चिन्हाने काही मते खाल्ली. त्यामुळे आमचा उमेदवार काही मताने पराभूत झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही ज्या जागा लढविणार आहोत. तेथेच चाचपणी करणार आहे. महाविकास आघाडी एकसंध कशी राहील हे पाहण्यात येते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात स्थान आहे. पक्षात घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजित पवार यांची घरवापसी होणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी घरात कोणाला घ्यायचे हा खासगी प्रश्न आहे. पण, कार्यकर्ता संघर्ष करतो. त्यांची मते महत्वाची आहेत. अजित पवार यांच्या घरवापसीची चर्चा नाही, असे स्पष्ट केले. 

तर विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर त्यांनी तेथे एकत्रित येऊन ठराविक घरात मारहाण आणि लुटमार झाली. हे राज्याला भूषणावह नाही. कारण ही गंभीर घटना आहे. यामध्ये राज्य शासनाला पूर्ण अपयश आलेले आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी. तसेच विशाळगडावरील अतिक्रमाणविरोधात आमची भूमिका आहे. पण, हे काम पावसाळ्यापूर्वी किंवा नंतर व्हायला हवे होते. तसेच याबाबत पर्यायी व्यवस्था करुन ते काढायला हवे होते, असेही त्यांनी सांगितले.

पूजा खेडकर प्रकरणात योग्य कारवाई हवी...प्रशिक्षणाऱ्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाबाबतही प्रदेशाध्यक्ष पाटील यांना प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी खेडकर यांना चुकीच्या पध्दतीने सर्टीफिकेट देण्यात आली आहेत. वाममार्गाने त्यांनी प्रवेश मिळवला आहे. याबाबत योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले.

लोकसभेला १४-१५ जागा लढविल्या असत्या पण...लोकसभा निवडणुकीत आघाडीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या. आता विधानसभा निवडणुकीत किती मिळणार असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत १४ ते १५ जागा आम्ही लढवू शकलो असतो. तसेच आमचे खासदारही वाढले असते. पण, आघाडी भक्कम रहावी म्हणून दोन पावले मागे आलो. विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना बरोबर घेऊन जागा वाटप होईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSatara areaसातारा परिसर