खंडाळा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा महामार्गावर अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आमदार प्रवीण दरेकर हे पुण्याहून महाबळेश्वरला निघाले होते. दरम्यान खंडाळाजवळील जुना टोलनाका ओलांडल्यानंतर सेवा रस्त्यावरून येणारी दुचाकी अचानक महामार्गावर समोर आली. यावेळी पोलीस वाहनाने अचानक ब्रेक लावला. यात पोलीस वाहनाची दुचाकीला धडक झाली. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. वाहनांचा ताफा अचानक थांबल्याने आमदार दरेकर यांनी खाली उतरून दुचाकीस्वाराची चौकशी केली, तसेच वाहनाच्या नुकसानीची पाहणी केली. किरकोळ अपघात असल्याने त्यांचा ताफा लगेच महाबळेश्वरकडे रवाना झाला.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:23 IST