शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

सातारा पंचायत समिती : सभापतीपदाची अंबवडे, किडगाव गणांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:21 IST

सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसभापतीपदाची अंबवडे, किडगाव गणांना संधीविद्या देवरे, सरिता इंदलकर प्रबळ दावेदार

सागर गुजरसातारा : सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.सातारा पंचायत समितीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या बहुमताची सत्ता आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले (पूर्वीची राष्ट्रवादी) यांच्या गटाचे ११, उदयनराजे भोसले यांच्या गटाचे ८ आणि भाजपचा १ असे पंचायत समितीमध्ये बलाबल आहे. सातारा, कोरेगाव आणि कºहाड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेचे १0 गट आणि पंचायत समितीचे २0 गण विभागले आहेत. तरी देखील शिवेंद्रसिंहराजे ठरवतील त्याच महिलेला सभापतीपदाची संधी मिळणार आहे.सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण असल्याने विद्या देवरे (अंबवडे गण), सरिता इंदलकर (किडगाव गण), कांचन काळंगे (वर्णे गण) आणि बेबीताई जाधव (अतित गण) या चौघींपैकी एकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले संधी देऊ शकतात. सभापती निवड करत असताना बाबाराजे विधानसभा मतदारसंघ बळकटीच्या दृष्टिने विचार करतात की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बळ वाढविण्याच्या उद्देशाने वेगळे पाऊल उचलतात, हे पुढील काही काळात समोर येईल.बेबीताई जाधव यांचा गण हा कºहाड उत्तर मतदारसंघात येतो. तर कांचन काळंगे यांचा गण काही प्रमाणात कºहाड उत्तर आणि काही प्रमाणात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तर विद्या देवरे आणि सरिता इंदलकर यांचे गण हे सातारा विधानसभा मतदारसंघात येतात. या दोन गणांमध्ये ताकद वाढविण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे प्रयत्न करणार आहेत.जावळी तालुक्यातील राजकीय संघर्ष वाढू लागला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विरोधक जावळीत एकवटले आहेत. आगामी काळात जावळी तालुक्यातून विरोध वाढू लागला तरी त्याचा विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परळी खोऱ्यात ताकद वाढविण्यासाठी बाबाराजे विद्या देवरे यांना सभापतीपद देऊ शकतात.

तसेच उपसभापतीपद हे लिंब जिल्हा परिषद गटातील जितेंद्र सावंत यांच्याकडे असल्याने राजकीय समतोल राखताना सरिता इंदलकर यांचा सभापतीपदासाठी विचार होईल का? हाही प्रश्न पुढे येतो. सध्याच्या घडीला शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचा विचार करुनच निर्णय घेतील, असे बोलले जात आहे.साताºयात संघर्ष अटळसातारा आणि जावळी पंचायतींमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणारे सदस्य निवडून आले आहेत. सदस्य पक्ष चिन्हांवर निवडून आले असले तरी त्यांच्यावर दोन्ही नेत्यांच्या विचारांचा पगडा आहे. जावळीत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. तर सातारा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे निवडून आलेले ११ सदस्य आहेत. आता दोन नेत्यांचे दोन गट तयार झाल्याने पंचायत समिती सभापती निवडीत प्रत्येकजण आपले प्यादे पुढे सरकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत सभापती निवडताना गटातटाचे राजकारण उफाळणार आहे.मन नेत्यापाशी; तन निवडून आलेल्या पक्षातपंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी व काँगे्रसच्या चिन्हांवर निवडून गेलेल्या सदस्यांच्या नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. नेते पक्षाबाहेर पडले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे अनेक सदस्यांना पक्ष सोडता आले नाहीत. त्यांचे मन नेत्यांसोबत आणि तन मात्र निवडून आलेल्या पक्षात असल्याचे चित्र सध्या पहायला मिळते आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीSatara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद