कचरा टाकण्यास विरोध केल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST2021-01-17T04:34:10+5:302021-01-17T04:34:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राहत्या घरासमोर कचरा टाकण्यास विरोध केला म्हणून चौघाजणांनी एका दाम्पत्यास दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

Opposing the dumping of garbage | कचरा टाकण्यास विरोध केल्याने

कचरा टाकण्यास विरोध केल्याने

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राहत्या घरासमोर कचरा टाकण्यास विरोध केला म्हणून चौघाजणांनी एका दाम्पत्यास दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करुन दुखापत केल्याचा प्रकार खटाव तालुक्यातील खातगूण येथे घडला. याप्रकरणी चौघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

रवींद्र पवार, संदीप पवार, अनुसया पवार आणि सचिन पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सूर्यकांत बाबू पवार (वय ५९, रा. खातगूण, ता. खटाव, सध्या रा. गोकूळनगर, पुणे) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रवींद्र तात्याराव पवार, संदीप तात्याराव पवार, अनुसया तात्याराव पवार आणि सचिन तात्याराव पवार (सर्व रा. खातगूण, ता. खटाव) यांनी शुक्रवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोरील अंगणात कचरा टाकला. याची विचारणा झाल्यानंतर या चौघानींही संगनमत करुन दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सूर्यकांत यांच्या पत्नीस हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. या घटनेनंतर सूर्यकांत यांनी या चौघांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार एस. एस. भोसले हे करत आहेत.

Web Title: Opposing the dumping of garbage