काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच लढतीची शक्यता

By Admin | Updated: January 23, 2015 23:37 IST2015-01-23T20:13:37+5:302015-01-23T23:37:49+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : विविध गटांच्या राजकीय हलचाली गतिमान

Opportunity to compete with Congress-NCP | काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच लढतीची शक्यता

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच लढतीची शक्यता

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मे महिन्यात होऊ घातलीय; पण २१ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत पात्र व्यक्ती व संस्था यांचे ठराव जमा करण्याची मुदत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत़ सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येच लढतीची शक्यता वर्तविली जात आहे़ जिल्हा बँकेवर अनेक वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांचे वर्चस्व होते़ जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा असताना काँग्रेसचे आमदार उंडाळकर जिल्हा बँकेचा कारभार हाकत होते़ ही बाब खटकणाऱ्या अजित पवारांनी गेल्या निवडणुकीत आघाडी घेतली अन् खऱ्या अर्थाने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आली़ आता सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे़ राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्हा पक्षाचा बालेकिल्ला आहे़ लोकसभा, विधानसभा निवडणुकीत देशात अन् राज्यात काँगे्रस आघाडीची पिछेहाट झाली असली तरी जिल्हा त्याला अपवाद ठरला. त्यामुळे भाजप, सेनेचे नेते जिल्हा बँकेत कितपत लक्ष घालतील, याबाबत शंका आहे़ भाजप लाटेमुळे दोन्ही काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत़ त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे मिटेल, असे सध्या तरी चित्र नाही़ उलट विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याची संधी म्हणून अनेकजण या निवडणुकीकडे पाहत आहेत.

विधानसभा निवडणुकीचे पडसाद शक्य
जिल्हा बँकेचे एकेकाळचे किंगमेकर विलासराव पाटील-उंडाळकर सतत बँकेचे संचालक राहिले आहेत़ यंदाही ते रिंगणात राहतील, अशी चर्चा आहे. पण, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपुरस्कृत म्हणून लढणारे उंडाळकर बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून असणार काय, याबाबत उलटसुलट चर्चा आहे़
जिल्ह्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले मूळच्या भाजप, सेना कार्यकर्त्यांकडे संस्थांची संख्या जास्त नसली तरी या नव्यांच्या येण्यामुळे भाजप, सेनेला काहीसे बळ मिळाले आहे, ते बळ बँक निवडणुकीच्या माध्यमातून ते दाखविण्याचा प्रयत्न करणार का, याबाबत उत्सुकता आहे़

Web Title: Opportunity to compete with Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.