ध्वनिमर्यादेच्या क्षेत्रांबाबत डॉल्बीधारकच अनभिज्ञ
By Admin | Updated: September 20, 2014 00:35 IST2014-09-19T22:34:24+5:302014-09-20T00:35:33+5:30
डेसिबल मोजणार कोण? : ‘कानावर’ हात ठेवून फक्त ‘वाजव’ म्हणा

ध्वनिमर्यादेच्या क्षेत्रांबाबत डॉल्बीधारकच अनभिज्ञ
संजय पाटील -कऱ्हाड -क्षेत्रनिहाय ध्वनिमर्यादेचे काही निकष आहेत़ कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या वेळी किती ध्वनी असावा, हेसुद्धा ठरवून दिलं गेलंय़ दरवर्षीच्या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांसमोर पोलिसांकडून या नियमांचा पाढाही वाचला जातो; पण ज्यांच्यासाठी हे नियम आहेत, त्यांनाच ते माहीत नाहीत, हे विशेष!
डॉल्बीसह इतर ध्वनिक्षेपकांचे आवाज जसजसे वाढत गेले, तसेच त्याचे दुष्परिणामही समोर येऊ लागले़ मनोरंजनाचं साधन आरोग्यासाठी घातक ठरू लागले आहे़ त्यातूनच ध्वनिमर्यादेच्या मुद्द्याने जोर धरला़ इतर ध्वनिक्षेपकांपेक्षा डॉल्बीला आवर घालण्याचीच अनेकांची मागणी आहे़ ध्वनिमर्यादेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देषानुसार ध्वनिमर्यादेची औद्योगिक, वाणिज्य, निवासी व शांतता अशी चार क्षेत्रे निश्चित करण्यात आली़ या चार क्षेत्रांमध्ये कोणत्या वेळी किती आवाज असावा, हेसुद्धा ठरविण्यात आले; पण बहुतांश डॉल्बी व्यावसायिकांना या क्षेत्रांविषयी आणि तेथी/हती नाही़ एवढेच नव्हे तर निर्धारित करून दिलेली संबंधित चार क्षेत्रे ओळखायची कशी, याबाबतच डॉल्बी व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे़ त्यामुळे एखाद्या ठिकाणची ‘सुपारी’ आली की, हे व्यावसायिक कसलाही विचार न करता त्याठिकाणी डॉल्बीच्या थाप्पीसह दाखल होतात़ ज्याने डॉल्बी मागवली तो कानावर हात ठेवून ‘फक्त वाजव’ म्हणतो आणि डॉल्बीचा आॅपरेटर कानात ‘हेडफोन’ घालून दणदणाट सुरू करतो़ न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरवून देण्यात आलेल्या क्षेत्रात ध्वनिमर्यादा तपासून पोलिसांकडून वारंवार कारवाई होणे अपेक्षित असते; पण दुर्दैवाने तसे होत नाही़ गणेशोत्सव व नवरात्रोत्सव कालावधीतच पोलीस डॉल्बीबाबत कडक धोरण अवलंबतात़ एरव्ही गल्लीबोळात आणि अगदी शांतता क्षेत्रातही डॉल्बीचा दणदणाट सुरू असताना पोलीस त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत़ ‘डेसिबल’ तपासात नाहीत़
गणेशोत्सव अथवा नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला की पोलीस डॉल्बीविरोधात जागर सुरू करतात; पण तोपर्यंत मंडळांनी डॉल्बीसाठी अॅॅडव्हान्स रक्कम दिलेली असते़ त्यामुळे उत्सवापूर्वी किमान एक महिन्यापासून पोलिसांनी डॉल्बीविरोधात कडक धोरण अवलंबणे व त्याची मंडळांना माहिती देणे गरजेचे आहे़ वरातीसह इतर कार्यक्रमात राजरोसपणे डॉल्बी दणाणते़ त्यावेळी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, हे चुकीचे आहे़
- नितीन काशीद, कऱ्हाड
क्षेत्रनिहाय ध्वनिमर्यादा
औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबलपर्यंत
वाणिज्य क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबलपर्यंत
निवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबलपर्यंत
शांतता क्षेत्रात दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबलपर्यंत