जिल्ह्यात कोरोनामुळे अवघा १ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:59+5:302021-09-02T05:25:59+5:30

सातारा : जिल्ह्यात ५७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूची संख्या ...

Only 1 death due to corona in the district | जिल्ह्यात कोरोनामुळे अवघा १ मृत्यू

जिल्ह्यात कोरोनामुळे अवघा १ मृत्यू

सातारा : जिल्ह्यात ५७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूची संख्या घटल्याने समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यामध्ये ११ हजार ५०३ तपासण्यांमधून ५७९ बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांवर स्थिर आहे. जावळीत ९, कऱ्हाडात ९२, खंडाळ्यात ८, खटावात ४६, कोरेगावात ७३, माणमध्ये ५७, महाबळेश्वरात १, पाटणमध्ये १४, फलटणमध्ये १२१, साताऱ्यात १२६, वाईत २५ व इतर ७ असे बुधवारअखेर एकूण २ लाख ४० हजार ७७ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. कऱ्हाड तालुक्यात एका बाधिताचा मृत्यू झाला. कऱ्हाड वगळता इतर १० तालुक्यांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या बुधवारी संध्याकाळपर्यंत ४१ जणांना घरी सोडण्यात आले असून, १० हजार २४९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Web Title: Only 1 death due to corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.