कोपर्डेकरांना पुण्याहून ऑनलाईन योगाचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST2021-06-11T04:26:13+5:302021-06-11T04:26:13+5:30

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील प्रत्येक घटक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडत आहे. गावातील काही युवक पुण्यामध्ये ...

Online Yoga Guide to Kopardekar from Pune | कोपर्डेकरांना पुण्याहून ऑनलाईन योगाचे मार्गदर्शन

कोपर्डेकरांना पुण्याहून ऑनलाईन योगाचे मार्गदर्शन

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील प्रत्येक घटक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडत आहे. गावातील काही युवक पुण्यामध्ये नोकरी, व्यवसायासाठी आहेत. त्यांचा या लढ्यात मोठा सहभाग आहे. त्यासाठी पुण्याहून कोपर्डे हवेलीचे डॉ. सचिन चव्हाण यांनी योग मार्गदर्शन शिबिरामध्ये निवेदकाची भूमिका बजावली तर योगाचे अभ्यासक डॉ. अमोल पाटील यांनी पहाटे योगाचे मार्गदर्शन केले.

सकाळी साडेसहा ते साडेसात अशी योगाची वेळ होती. त्यातील शेवटची पाच मिनिटे डॉ. सचिन चव्हाण यांनी कोरोनाविषयी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. वैभव चव्हाण, डॉ. किशोर चव्हाण, डॉ. रोहित चव्हाण, डॉ. अभिषेक चव्हाण यांचा समावेश होता. त्यामध्ये योगाचे आणि आजाराची कशी काळजी घेतली पाहिजे, याविषयी लोकांच्या मनातील प्रश्न निवेदकाच्या भूमिकेत डॉ. सचिन चव्हाण यांनी विचारले. ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, शिवाजी चव्हाण, गणेश चव्हाण, दादासाहेब चव्हाण, विजय चव्हाण, शुभम चव्हाण, विवेक चव्हाण, किशोर साळवे, मारुती चव्हाण, सागर साळवे आदींसह योद्धा ग्रुपचे सदस्य तर पुण्याहून संजय चव्हाण यांची दररोज रात्री कोविड योद्ध्यांची ऑनलाईन बैठक असते. यासंदर्भात ते मार्गदर्शन करतात. चार भागांत योगाची सत्र यू ट्यूबवर तयार असून, ती दाखविण्याचे काम सुरू आहे.

चौकट...

डॉक्टर वाढवताहेत रुग्णांचा आत्मविश्वास

गावातील योद्धा ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत अनेक रुग्णांना रुग्णालयात, कोरोना सेंटरमध्ये दाखल केले आहे. तर गावातील डॉक्टर कोरोनाच्या आजाराविषयी रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतात. प्रत्येक क्षेत्रातील घटक गावासाठी आणि गावातील ग्रामस्थांसाठी योगदान देत आहे.

Web Title: Online Yoga Guide to Kopardekar from Pune