ऑनलाईन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:49 IST2021-02-20T05:49:49+5:302021-02-20T05:49:49+5:30

स्ट्रॉबेरीचे नुकसान मेढा : मेढा परिसरात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी अडीचपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसाने वातावरणात ...

Online workshop | ऑनलाईन कार्यशाळा

ऑनलाईन कार्यशाळा

स्ट्रॉबेरीचे नुकसान

मेढा : मेढा परिसरात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी अडीचपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीचे तसेच काढणीस आलेल्या गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले.

आंब्याचे नुकसान

मेढा : जावळी तालुक्यात गुरुवारी झालेेल्या अवकाळी पावसाने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेढा या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. हवेत कमालीचा गारवा पसरला होता.

ज्वारी जमीनदोस्त

खंडाळा : खंडाळा, शिरवळसह परिसरात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. या जोरदार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी जमीनदोस्त झाली. हरभऱ्यासह इतर पिकाचे नुकसान झाले. तसेच पावसामुळे जागोजागी डबकी साचली होती.

Web Title: Online workshop