केबीपी पॉलिटेक्निकमध्ये ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी वर्कशॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:25+5:302021-02-14T04:36:25+5:30

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी व कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० रोजी ‘ऑनलाईन ...

Online Teaching Methodology Workshop at KBP Polytechnic | केबीपी पॉलिटेक्निकमध्ये ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी वर्कशॉप

केबीपी पॉलिटेक्निकमध्ये ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी वर्कशॉप

Next

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी व कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० रोजी ‘ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी’चे एक दिवसीय वर्कशॉप कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक पानमळेवाडी, सातारा येथे झाले.

या वर्कशॉपचे उद्घाटन उपआयुक्त जात पडताळणी समाज कल्याण विभाग सातारा स्वाती इथापे व सहआयुक्त समाज कल्याण विभाग सातारा नितीन उबाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती, कागदपत्रे, आदींबाबत मार्गदर्शन केले. एमएसबीटीईचे उपसचिव उस्मानी शाहीद यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. वर्कशॉपमध्ये प्रा. जे. बी. जगताप यांनी पॉलिटेक्निकबाबत, प्रा. व्ही. के. यादव यांनी गुगल मिट व गुगल फॉर्म, प्रा. बी. एस. घोरपडे व प्रा. ओ. आर. उरुणकर यांनी गुगल क्लासरूम तसेच प्रा. ए. एम. नेवसे यांनी मूडल अशा विविध ऑनलाईन शिक्षण माध्यमांबाबत मार्गदर्शन केले. फाउंडेशन ओएसीसचे कौन्सिलर डॉ. मोरे यांनी आपले जीवन कसे व्यवस्थापित करावे, या संदर्भात मार्गदर्शन केले. वर्कशॉपमध्ये संस्थेच्या विविध शाळेतील मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक तसेच पॉलिटेक्निकचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले. समारोपप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे संचालक प्राचार्य आर. के. शिंदे यांनी सर्व उपस्थितांना आगामी काळातील शिक्षणपद्धती आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांना ‘ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी’चे एक दिवसीय वर्कशॉपचे प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. (वा.प्र.)

फोटो आहे... १३केबीपी

Web Title: Online Teaching Methodology Workshop at KBP Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.