तरुण पिढी घरबसल्या करतेय एसटीचे ऑनलाइन आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:16+5:302021-08-29T04:37:16+5:30

सातारा : काळ बदलला असल्याने कोणालाही थांबायला वेळ नाही. अशा वेळी एसटी स्टॅण्डवर आल्यावर एसटी गच्च भरलेली असते. त्यामुळे ...

Online reservation of ST is done by the younger generation at home | तरुण पिढी घरबसल्या करतेय एसटीचे ऑनलाइन आरक्षण

तरुण पिढी घरबसल्या करतेय एसटीचे ऑनलाइन आरक्षण

सातारा : काळ बदलला असल्याने कोणालाही थांबायला वेळ नाही. अशा वेळी एसटी स्टॅण्डवर आल्यावर एसटी गच्च भरलेली असते. त्यामुळे उभे राहून धक्के खात कोणी प्रवास करायचा म्हणून आसनाचे आगामी आरक्षण केले जाते. मात्र नवी पिढी काउंटरवर जाऊन आरक्षण करण्यासही कंटाळा करीत असून, तरुणाई स्वत:च्या मोबाइलवरून बुकिंग करत आहे.

सातारा जिल्ह्यातून मुंबई, बोरीवली, हैदराबाद या लांब पल्ल्यासाठी शक्यतो ऑनलाइन बुकिंग करण्यावर भर दिला जातो. या गाड्या बाहेरील विभागातून येतात. त्यामध्ये अगोदरच गर्दी असते. अशावेळी जागा नाही मिळाली तर उभे राहून प्रवास करावा लागतो. जवळचा प्रवास असल्यास काही वाटत नाही. मात्र लांबच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणेच उत्तम ठरते. त्यामुळे आगाऊ आरक्षण करण्याला पसंती दिली जाते.

यासाठी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात संगणकीय आरक्षण खिडकीही उपलब्ध केली आहे. मात्र त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर रांगा असतात. बसस्थानकात येऊन आरक्षण करण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीने आरक्षण केले जाते.

चौकट

असे करावे

ऑनलाइन बुकिंग

nएसटीमध्ये आगाऊ प्रवासासाठी आरक्षण नोंदविण्यासाठी एसटीत संगणकीय आरक्षण कक्ष केला आहे.

nज्यांना येथे येणे जमणार नाही, असे www.msrtc.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. यासाठी डेस्क आणि पर्मनंट लाॅगिन करता येते.

कोट

सातारा मध्यवर्ती बसस्थाकात ऑनलाइन आरक्षणासाठी संगणकीय आरक्षण खिडकी तयार केली आहे. या ठिकाणी दररोज असंख्य प्रवासी येऊन लाभ घेत असतात. तसेच ऑनलाइन पद्धतीने मोबाइलवरून नोंद करून लाभ घेता येतो.

- रेश्मा गाडेकर, आगार व्यवस्थापक

चौकट कोट

सणावाराला चांगला फायदा

दिवाळीच्या सणाला मुंबईहून मुली नातवंडांना घेऊन येतात. सण झाल्यावर ते परत जातात. तेव्हा तर बाहेर गेटपर्यंत रांग लागते. अशा वेळी आमचे पाहुणे पूर्वी बसस्थानकात जाऊन आरक्षण करीत. आता तर ते चार दिवस अगोदरच घरातून आरक्षण करतात.

- संजय पवार, सातारा.

आपण एकटे असलो तर प्रवास करायला काही वाटत नाही. चार ठिकाणी एसटी बदलू शकतो. मात्र कुटुंबीय बरोबर असतील तर आरक्षण करण्याशिवाय पर्याय नसतो. मोबाइल साधा असला तरी आम्ही बसस्थानकात जाऊन आरक्षण करून प्रवास करतो.

- बालाजी परदेशी, सातारा.

Web Title: Online reservation of ST is done by the younger generation at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.