शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:21 IST

onion, Market, Satara area सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असलीतरी दरात सतत घसरण सुरू आहे. जुन्या कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर निघाला. तर मागील आठवड्याच्या तुलनेत जुन्या कांद्यामागे दीड हजार तर नव्या कांद्याला ५०० रुपये कमी भाव निघाला.

ठळक मुद्दे साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव जुन्याला दीड तर नव्याला ५०० रुपये कमी निघाला दर

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असलीतरी दरात सतत घसरण सुरू आहे. जुन्या कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर निघाला. तर मागील आठवड्याच्या तुलनेत जुन्या कांद्यामागे दीड हजार तर नव्या कांद्याला ५०० रुपये कमी भाव निघाला.सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव अशा अनेक तालुक्यांतून शेतीमाल येतो. दर गुरुवारी आणि रविवारी मालाची आवक अधिक राहते. गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर वाढू लागले होते. सातारा बाजार समितीतही कांद्याला क्विंटलला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने दर ढासळले. सध्याही दरात घसरण सुरूच आहे.सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची १४८ क्विंटलची आवक झाली. यामध्ये जुन्या कांद्याला क्विंटलला चार ते पाच हजार रुपये दर आला. तर नव्याला क्विंटलला दोन ते तीन हजार भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात चांगलीच घसरण झाली आहे. तर वांग्याची अवघी २० क्विंटल आवक झाली. तर १० किलोला ५५० ते ६५० रुपयादरम्यान दर मिळाला.

टोमॅटोची ७९ क्विंटल आवक होऊन १० किलोला दर २०० ते २८० रुपयांपर्यंत मिळाला. कोबीला ३०० ते ४०० रुपये दर निघाला. तर फ्लॉवरचा भाव कमी झाला. ५५ क्विंटलची आवक होऊन १० किलोला २५० ते ३५० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला ३०० ते ३५० रुपये दर आला. दोडक्याच्या दरात घसरण झाली.कारल्याला १० किलोला ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. वाटण्याचाही दर तेजीत आहे. १० किलोला १३०० ते १५०० रुपये दर निघाला. तर पावट्याला १० किलोला ५०० ते ६०० रुपये भाव मिळाला. गवारला ४०० ते ५०० रुपये दर आला. शेवग्याला ८०० ते १ हजार रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. हिरव्या मिरचीत तेजी आली आहे.वांगी, शेवगा अन् वाटाणा तेजीत...सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या दरात घसरण झाली असलीतरी वांगी, शेवगा अन् वाटाणा तेजीत आहे. गेल्या महिन्यापासून वांगी भाव खाऊ लागली आहेत. तर वाटाण्यालाही १५ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळत आहे. शेवग्यालाही गेल्या काही दिवसांपासून दर मिळू लागलाय.मेथी, कोथिंबिरचा भाव कमी...अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यानंतर सध्या आवक बऱ्यापैकी होत आहे. बाजार समितीत गुरुवारी मेथीच्या २२०० पेंडीची आवक झाली. पेंडीला शेकडा दर ८०० ते १२०० रुपये मिळाला. तर कोथिंबिरची २५०० पेंडी आवक होऊन शेकडा भाव ५०० ते १ हजार रुपये मिळाला. तर मंडईत मेथी आणि कोथिंबिर पेंडी १० ते १५ रुपयांच्या पुढे मिळत होती. सध्या मेथी, कोथिंबिरचा भाव कमी झाला आहे. 

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसरMarketबाजार