दारू सुटत नसल्याने एकाची आत्महत्या
By Admin | Updated: September 13, 2015 00:18 IST2015-09-13T00:18:56+5:302015-09-13T00:18:56+5:30
राहत्या घरात गळफास

दारू सुटत नसल्याने एकाची आत्महत्या
सातारा : दारू सुटत नसल्याच्या नैराश्यातून येथील गुरुवार पेठेतील विनोद विलास दुपट्टे (वय ४०) यांनी शनिवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घरात कोणी नसताना विनोद यांनी घरातील तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
विनोद यांनी आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, मी बऱ्याचवेळा दारू सोडण्याचा प्रयत्न केला; परंतु माझी दारू सुटली
नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.’
या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)