ग्रामसेवकाला मारहाण करणार्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:02+5:302021-04-04T04:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रांजणी (ता. जावळी) येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू असतानाच तेथे येऊन ग्रामसेवकाला मारहाण करून ...

ग्रामसेवकाला मारहाण करणार्याला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रांजणी (ता. जावळी) येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू असतानाच तेथे येऊन ग्रामसेवकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
याबाबत माहिती अशी, दिनांक २ जुलै २०२० रोजी सायंकाळी ४.१५च्या सुमारास रांजणी गावचे ग्रामसेवक दुर्योधन बळीराम शेलार हे कोरोना विषाणू प्रादुर्भाव अनुषंगाने सरपंच व सदस्य यांच्यासोबत कार्यालयातील बैठकीत चर्चा करत होते. यावेळी आरोपी राजेंद्र बाबुराव राजने (वय ३८, रा. रांजणी, ता. जावली) हा त्याठिकाणी आला. त्याने शेलार यांच्या टेबलासमोर येवून विनाकारण पायातील चप्पल काढून फिर्यादी यांच्या गालावर मारली तसेच शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामकाजात अडथळा आणला. याबाबतची फिर्याद ग्रामसेवक शेलार यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या गुन्ह्याचा तपास मेंढ्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. सी. चामे यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करुन न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. यावेळी आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी राजेंद्र रांजणे याला दहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे एम. यु. शिंदे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेभोसले, जिल्हा न्यायालयातील पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घारगे, हवालदार शेख, बेंद्रे, शिंदे, शेख, कुंभार, घोरपडे, भरते यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.