फलटणमधून एकाला सहा महिन्यांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:56+5:302021-09-18T04:41:56+5:30
फलटण : येथील छोट्या उर्फ तौसिफ अब्दुल शेख यास सहा महिन्यांकरिता फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती ...

फलटणमधून एकाला सहा महिन्यांसाठी तडीपार
फलटण : येथील छोट्या उर्फ तौसिफ अब्दुल शेख यास सहा महिन्यांकरिता फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांंनी दिली.
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्याच्यावर दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच ज्यांच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करूनदेखील त्यांच्या वागण्यात सुधारणा झालेली नसल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी आदेश केले होते. त्याप्रमाणे या गोष्टीचे गांभीर्य ओळखून फलटण शहर पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षकांमार्फत उपविभागीय अधिकारी फलटण शिवाजीराव जगताप यांच्याकडे छोट्या उर्फ तोसिफ अब्दुल शेख (रा. गजानन चौक, गोल्डन बेकरीशेजारी, फलटण) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे प्रस्ताव सादर करून शेख यास एक वर्षाकरिता फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात यावे, याबाबत विनंती केली होती. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी फलटण शिवाजीराव जगताप यांनी शेख यास फलटण तालुक्यातून सहा महिन्यांकरता तडीपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक एस.ए. बनकर, पोलीस नाईक शरद तांबे यांनी केली.