शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रेन-दुचाकी अपघातात सख्या बहिणींपैकी एक ठार, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:16 IST

Accident Satara : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी, ता.सातारा येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघी सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय २३) असे मृत बहिणीचे तर किरण काशीनाथ मसुगडे (वय २१, दोघी रा.अपशिंगे.(मि.) ता.सातारा) असे गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या बहिणीचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला.

ठळक मुद्देक्रेन-दुचाकी अपघातात सख्या बहिणींपैकी एक ठार, एक गंभीर जखमीबोरगाव पोलीस ठाण्यात तपास सुरू

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी, ता.सातारा येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघी सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय २३) असे मृत बहिणीचे तर किरण काशीनाथ मसुगडे (वय २१, दोघी रा.अपशिंगे.(मि.) ता.सातारा) असे गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या बहिणीचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातून मंगळवारी सायंकाळी टोव्हिंग क्रेन (नं. एम एच ०९ बी सी २९२८) चालक भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाला होता. ही टोव्हिंग क्रेन भरतगाववाडी, ता.सातारा गावच्या हद्दीत आली असता तिने पुढे चाललेल्या मोटारसायकला (एम एच ११ सी वाय ३१२०) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघी बहिणी अक्षरशः चेंडूसारख्या हवेत उडाल्या. तर त्यांची दुचाकीही अनेक पलट्या खाऊन महामार्गावरून खाली खड्ड्यात जाऊन पडली. तर टोव्हिंग क्रेनने महामार्गालगतचे चार ते पाच संरक्षक दगडही उखडून टाकले.या अपघातात दुचाकीवरील तेजस्विनी मसुगडे व किरण मसुगडे या सख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थ व महामार्गावरील इतर वाहनचालकांनी त्यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून दोघींनाही उपचारासाठी सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र उपचारापूर्वी तेजस्विनी मसुगडे हिचा मृत्यू झाला, तर किरण मसुगडे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम,चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने व टोव्हिंग क्रेनचालक इरफान मुबारक मुजावर (रा.कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास हवालदार मनोहर सुर्वे हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर