शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Satara: भावासह आईच्या खूनप्रकरणी एकाला आजन्म कारावास, वाटणीच्या कारणावरून केला होता खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:31 IST

कऱ्हाड : भाऊ आणि आईचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे ...

कऱ्हाड : भाऊ आणि आईचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. दिलीप पतंगे यांनी बुधवारी ही शिक्षा ठोठावली.राकेश गजानन घोडके (वय ५०, रा. श्रीराम निवास, आझाद कॉलनी, आगाशिवनगर, कऱ्हाड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. राजेश गजानन घोडके (वय ४०), जयश्री गजानन घोडके (वय ६३) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. सरकार पक्षाचे वकील ॲड. आर. डी. परमाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील आझाद कॉलनीतील श्रीराम निवास येथे घोडके कुटुंब वास्तव्यास होते. त्यांच्या घराचा वरचा मजला तसेच खालच्या मजल्यावरील वाटणीवरून राकेश याचा भाऊ राजेश व आई जयश्री यांच्याशी वाद होता.९ एप्रिल २०१८ रोजी राकेश आणि राजेश यांच्यात सकाळी पुन्हा वाद झाला. त्यावेळी राकेश याने आई जयश्री व भाऊ राजेश यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करीत डोक्यात पाईप घातला. त्यानंतर धारदार शस्त्राने भावासह व आईचा खून केला. या प्रकरणी अलंकार श्यामराव जोशी यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एच. राजमाने यांनी केला. खटल्याची सुनावणी न्या. दिलीप पतंगे यांच्यासमोर झाली. सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने या गुन्ह्यात आरोपी राकेश घोडके याला दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला पैरवी अधिकारी एस. व्ही. पाटील, हवालदार एस. व्ही. खिलारे, एस. बी. भोसले, ए. आर. पाटील यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCourtन्यायालय