शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बेकायदेशीर शेअर ॲपच्या माध्यमातून एकास ४२ लाखांचा गंडा, अज्ञातांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:37 IST

व्हॉटस्ॲप कॉलद्वारे शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. मात्र, त्यासाठी २० टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले.

कराड : एका नोकरदार व्यक्तीची तब्बल ४२ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आल्याची घटना सैदापूर, ता. कराड येथे घडली आहे.भरत दशरथ काकडे, रा. सैदापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया व बेकायदेशीर शेअर ॲपच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तासवडे एमआयडीसीतील कंपनीत सैदापूर येथील भरत काकडे नोकरी करत आहेत.८ डिसेंबर २०२५ रोजी फेसबुकवरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर युविका सान्याल असे नाव सांगणाऱ्या महिलेने लिंक पाठवून एका व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये त्यांना ॲड केले. या ग्रुपमध्ये १६० पेक्षा अधिक सदस्य होते. दररोज मोठ्या नफ्याचे स्क्रीनशॉट त्यामध्ये शेअर केले जात होते. २० डिसेंबर रोजी व्हॉटस्ॲप कॉलद्वारे शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. मात्र, त्यासाठी २० टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले.तसेच पॅन कार्डची माहिती घेतल्यानंतर एक ॲप डाउनलोड करून खाते सुरू करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार भरत काकडे यांनी पैसे भरले. सुरुवातीला ९९ हजार, त्यानंतर ५० हजार, त्यानंतर १.२५ लाख व २.२० लाख अशी रक्कम भरायला सांगत ॲपमध्ये नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आणखी एक ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले.

दिनांक ८ जानेवारी २०२६ पर्यंत वेगवेगळ्या पर्यायाने ऑनलाइनद्वारे पैसे पाठवण्यात आले. याप्रकारे भरत काकडे यांच्याकडून एकूण ४२ लाख ३५ हजार २६० रुपये आरोपींनी उकळले. १३ जानेवारी रोजी त्यांनी नफा दाखविलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता तो नाकारण्यात येऊन त्यांच्याशी संपर्क तोडण्यात आला.यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भरत काकडे यांनी सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. तसेच कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञातांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Man Duped of ₹42 Lakhs in Illegal Share App Scam

Web Summary : A Satara man lost ₹42.35 lakhs to an online share app scam. Lured by high returns, he invested through an app and WhatsApp group, only to be defrauded. Police have registered a case against unknown individuals and are investigating.