सुनिशा शहा यांच्या प्रयत्नातून एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:33+5:302021-02-05T09:12:33+5:30
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य सुनिशा शहा यांच्या प्रयत्नामुळे २६ जानेवारी रोजी मूकबधीर महिलेला एक लाखाची मदत ...

सुनिशा शहा यांच्या प्रयत्नातून एक लाखाची मदत
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य सुनिशा शहा यांच्या प्रयत्नामुळे २६ जानेवारी रोजी मूकबधीर महिलेला एक लाखाची मदत देण्यात आली. प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, सुनिशा शहा व सुरभी चव्हाण यांनी पीडित मूकबधीर महिलेला एक लाख रुपयांची मदत केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा जिल्ह्यातील घटना मांडली. सुनिशा शहा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. दोन्ही नेत्यांनी क्षणाचाही विलंब न लावता एक लाखाची मदत दिली. चित्रा वाघ यांनी ती मदत त्यांच्या सहकारी सुनिशा शहा व सुरभी भोसले यांच्या हस्ते पीडित महिलेच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली.
वाघ म्हणाल्या, ‘संबंधित गावातील गुंड प्रवृत्तीच्या तीस वर्षीय युवकाने केलेल्या या अत्यंत घृणास्पद कृत्याचा निषेध आहे. या पीडित महिलेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळायला हवी.’
फोटो
२८सुनिशा शहा
भारतीय जनता पक्षाकडून सुनिशा शहा, सुरभी चव्हाण यांच्या प्रयत्नातून पीडित महिलेला आर्थिक मदत देण्यात आली.