ओझर्डे येथे ट्रक, दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:09+5:302021-04-04T04:41:09+5:30
पाचवड : ट्रक व दुचाकी अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात ओझर्डे (कदमवाडी) येथे शुक्रवार, दि. २ ...

ओझर्डे येथे ट्रक, दुचाकी अपघातात एक ठार
पाचवड : ट्रक व दुचाकी अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात ओझर्डे (कदमवाडी) येथे शुक्रवार, दि. २ रोजी रात्रीच्या सुमारास घडला.
याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भारत गॅस कंपनीचा ट्रक (एमएच १० झेड ४९३६) वाईमधून गॅस भरून कोल्हापूरकडे निघालेला होता. हा ट्रक ओझर्डे (कदमवाडी) येथील कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ आला असता विरुद्ध बाजूने अचानक दुचाकी (एमएच ११ सीए ६९४४) ही भरधाव वेगाने आली व ट्रकला धडकली. त्यामध्ये दुचाकी चालक विजय शंकर चव्हाण (रा. संगोगी ता. आक्कलकोट, जि. सोलापूर) हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी सातारा येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय अवघडे अधिक तपास करीत आहेत.