आरळे येथे अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST2021-04-17T04:38:31+5:302021-04-17T04:38:31+5:30

सातारा : तालुक्यातील आरळे येथे पिकअपच्या धडकेत गवंडीकाम करणारा एक जण जखमी झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर ...

One injured in an accident at Arale | आरळे येथे अपघातात एक जखमी

आरळे येथे अपघातात एक जखमी

सातारा : तालुक्यातील आरळे येथे पिकअपच्या धडकेत गवंडीकाम करणारा एक जण जखमी झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून, तानाजी पवार असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तानाजी रामचंद्र पवार (वय ५२, रा. सातारा रोड, ता. कोरेगाव) हा त्याच्या ताब्यातील पिकअप (क्र. एमएच ११ बीसी १५३२) आरळे गावच्या हद्दीत लोणंद ते सातारा रस्त्यावर असणाऱ्या आरळे बसस्थानकाजवळ भरधाव राँग साइडने चालवत होता. या अपघातात बाळासाहेब सीताराम गवळी (वय ५३, रा. श्रीनिवास कॉलनी, रामकुंड, सातारा) हे जखमी झाले. ही घटना दि. १२ रोजी घडली असून, याप्रकरणी बाळासाहेब माळी यांनी तक्रार दिल्यानंतर तानाजी पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक महांगडे हे करत आहेत.

Web Title: One injured in an accident at Arale