पोतले येथे अठरा वर्षांवरील ग्रामस्थांचे शंभर टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:21+5:302021-09-18T04:41:21+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या पोतले गावातील अठरा वर्षांवरील ग्रामस्थांचे शंभर टक्के लोकांचे पहिले ...

पोतले येथे अठरा वर्षांवरील ग्रामस्थांचे शंभर टक्के लसीकरण
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या पोतले गावातील अठरा वर्षांवरील ग्रामस्थांचे शंभर टक्के लोकांचे पहिले कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सुनील कोरबू यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुप्रिया बनकर, सुनीता थोरात, आरोग्य सहायक पंकज नलवडे, आर. जे. इनामदार, समुदाय आरोग्य अधिकारी किरण जगताप, आरोग्यसेवक संतोष जाधव, वनिता खुडे-जाधव, मृदुला पाटील, आशासेविका शोभा शिंदे, वर्षा पाटील, मनीषा गरूड, वैशाली जाधव, वैशाली गरूड, सीमा लोकरे यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांना जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले त्यांचे मार्गदर्शन लाभले.
पोतले येथे १६ एप्रिल रोजी पहिले शिबिर आयोजित केले होते. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी शेवटचे शिबिर घेण्यात आले. या दरम्यानच्या कालावधीत गावातील कोरोना लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्यात आला. कोळे आरोग्य केंद्रामध्ये बहुदा कऱ्हाड तालुक्यातील अठरा वर्षांवरील लोकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले पहिले गाव असावे.
चौकट :
गेली सहा महिने कोरोनावर काम करत असताना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. यातून खूप काही शिकता आले. समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. कोरोनामुक्त गाव करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे होते. याकामी ग्रामपंचायत पोतले यांचे संयुक्त सहकार्यातून आणि आम्ही हे सहज करू शकलो, असे मत कोळे येथे आरोग्य सहायक पंकज नलवडे यांनी व्यक्त केले.