४३ ग्रामपंचायतींची शंभर टक्के करवसुली
By Admin | Updated: April 19, 2015 00:37 IST2015-04-19T00:37:25+5:302015-04-19T00:37:25+5:30
पाटण तालुका : चार गावांचा अॅडव्हान्स वसुलीचा विक्रम

४३ ग्रामपंचायतींची शंभर टक्के करवसुली
पाटण : न्यायालयाची धास्ती, गटविकास अधिकाऱ्यांचा पाठपुरावा आणि ग्रामसेवकांची कार्यतत्परता, असा त्रिवेणी संगम जुळून आल्यामुळे पाटण तालुक्यातील २४१ पैकी ४३ ग्रामपंचायतींची २०१४-१५ या
वर्षात शंभर टक्के करवसुली झाली आहे. यामुळे संबंधित गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चार गावांची अॅडव्हान्स वसुलीही झाली आहे.
पाटण तालुक्यातील कोदळ (पुनर्वसन), विरेवाडी, पाठवडे, डांगिष्टेवाडी, कळंबे, कुशी, निवडे (पुनर्वसन), भांबे, रामिष्टेवाडी, कवडेवाडी, सुरूल, टोळेवाडी, कारवट, मान्याचीवाडी, काठी, सुळेवाडी, सावरघर, बांधवट, पाबळवाडी, काहीर, डोंगळेवाडी, आसवलेवाडी, भिलारवाडी, गव्हाणवाडी, गोठणे, महिंद, बाचोली, कारळे, पाळशी, पाणेरी, मराठवाडी, धजगाव, कळकेवाडी, मत्रेवाडी, साखरी, बनपेठवाडी, शितपवाडी, नाणेल, भारसाखळे, सडावाघापूर, शिद्रुकवाडी, सातर, भूडकेवाडी या ४३ गावांची शंभर टक्के करवसुली झाली आहे.
पाटण तालुक्याच्या इतिहासात प्रथमच अशी वसुली झाली आहे. तसेच यापुढेही जाऊन २०१५-१६ या सालासाठी दि. १ एप्रिलपर्यंत चार गावांनी शंभर टक्के अॅडव्हान्स करवसुली करून वेगळा विक्रम केला आहे. ४३ गावांनी १०० टक्के करवसुली केली असल्याने संबंधित गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)