एक हात स्टेअरिंगवर तर दुसरा मोबाईलवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:37+5:302021-01-23T04:40:37+5:30

वाठार स्टेशन : एका बाजूने रस्ते सुरक्षा सप्ताह आयोजित केला जात असतो. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी जाहिरात करुन ...

One hand on the steering wheel and the other on the mobile! | एक हात स्टेअरिंगवर तर दुसरा मोबाईलवर!

एक हात स्टेअरिंगवर तर दुसरा मोबाईलवर!

वाठार स्टेशन : एका बाजूने रस्ते सुरक्षा सप्ताह आयोजित केला जात असतो. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी जाहिरात करुन राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी प्रवाशांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतात. पण त्याला एखाद-दुसऱ्या चालकामुळे गालबोट लागत आहे.

सातारा-लोणंद मार्गावर चालक एसटी चालवत असताना मोबाईलवर बोलत होते. त्यामुळे प्रवाशांत भीती निर्माण झाली आहे. कोणतेही वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, हा साधा नियम आहे. परंतु, ही बंदी केवळ नावापुरतीच राहिली आहे. कोरोना काळात एसटी बससेवा प्रवाशांअभावी कोलमडून गेली असताना काही वाहकांबरोबर चालकही बस चालविताना मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चालकाचा मोबाईल बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. या मार्गावर बुधवारी बारामती-कोल्हापूर ही बस सकाळी सातारा बाजूकडे जात असताना या बसचे चालक एका हातात स्टेअररिंग तर दुसऱ्या हातात मोबाईल कानाला लावून कर्तव्य बजावत होते. अशाप्रकारे वाहन चालविणे प्रवाशांना किती महागात पडेल, याची खबरदारी घेऊन एसटीचालकाचा मोबाईल वाहन चालवत असताना तरी बंद ठेवावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

२१वाठार स्टेशन

सातारा-लोणंद मार्गावर बुधवारी बारामती-कोल्हापूर या एसटीचे चालक वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलत होते. (छाया : संजय कदम)

Web Title: One hand on the steering wheel and the other on the mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.