एकीकडे खलबते... दुसरीकडे बंडखोर वक्तव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 23:51 IST2016-03-20T22:17:15+5:302016-03-20T23:51:00+5:30

उदयनराजेंची बेधडक टीका : राष्ट्रवादीचे आमदार मात्र ‘झेडपी’ सभापती निवडीमध्ये व्यस्त

On one hand ... rebel statement on the other hand! | एकीकडे खलबते... दुसरीकडे बंडखोर वक्तव्य!

एकीकडे खलबते... दुसरीकडे बंडखोर वक्तव्य!

  सातारा : जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीसाठी ‘झेडपी’ अध्यक्षांच्या निवासस्थानी एकीकडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची खलबते सुरू असतानाच दुसरीकडे मात्र केवळ शंभर मीटर अंतरावर असलेल्या सर्किट हाऊसमध्ये त्याच पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बेधडक त्यांना अपेक्षित असणाऱ्या ‘दादागिरी’चा खरपूस समाचार घेतला. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राजीनामा नाट्य चांगलेच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी सभापतींनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरील निवडीसाठी रविवारी राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकत्र आले होते. आदल्या दिवशीच सभापती निवडीचा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर केला होता; मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक पत्रकार परिषद तीही ‘झेडपी’ अध्यक्षाच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच घेतली. एकीकडे पक्षामध्ये सुरू असलेली बंडखोरी थोपविण्यासाठी सर्व आमदार निवडीच्या निमित्ताने एकत्र आले असताना उदयनराजे यांनी मात्र कुठली बैठक? कसली बैठक माहीत नाही, अशी सुरुवात करतच खळबळजनक वक्तव्येकेली. उदयनराजे म्हणाले, ‘जिल्हा बँकेच्या कार्यकारिणीमध्ये मला घ्या,’ असं मी सांगितलं. तेंव्हा मला सांगण्यात आलं, ‘ठिक आहे; पण पवारसाहेबांशी यावर बोलायला लागेल. सर्व निर्णय बंद लखोट्यात होतात,’ अशी रामराजे यांची नक्कल करत त्यांनी सांगितले. ‘तेव्हाच मला वाटलं, अरे एवढ्याशा कार्यकारिणीसाठी मला पवारसाहेबांशी बोलावं लागेल. बंद लखोटा काय असते, हे मला माहिती नाही. त्यामुळे मी म्हटलं बंद लखोट्यात काय आहे, हे मला दाखवू नका; पण लखोटा कसा असतो, हे तरी दाखवा. पण, कुठलं काय लखोटा-बिकोटा काही नसते, हे समजलं. इथे फक्त सोयीचे राजकारण असते. मी जर उघड-उघड बोललो नसतो तर ज्येष्ठ नेते सदाशिवराव पोळ, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील-वाठारकर यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले नसते,’ असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी) हिम्मत असेल तर संरक्षण सोडा! मी ओपन चॅलेंज देतो, हिम्मत असेल तर भ्रष्टाचार करणाऱ्यांनी सुरक्षा काढून रस्त्यावर फिरून दाखवा. त्यावेळी लोक काय अवस्था करतील, हे कळेल. मी स्वत: लोकांमध्ये जातो. कारण मी नैतिकता पाळली आहे. हे इतर नेत्यांनी करून दाखवावे. नेत्यांना घरी बसवा ! भ्रष्टाचारी नेत्यांना लोकांनी जाब विचारला पाहिजे. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना घेराओ घातला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांना रस्त्यावर फिरूही देऊ नका. मग इथे आमदार आहे की खासदार, हे सुद्धा पाहू नका. त्यांना घरी बसवा, असा उदयनराजे यांनी नेत्यांचा समाचार घेतला. उदयनराजे काय म्हणाले... विकासकामांसाठी विरोधकांना भेटण्यात गैर काय? लोकांची सहनशीलता संपली. १८५७ सारखे बंड होऊ शकेल कुठला पक्ष अन् कुठलं काय, कोणीही असू द्या, भ्रष्टाचाऱ्याला आत टाका ओवेसीला फटकारले, देशाचा जयजयकार करायला लाज का वाटली पाहिजे सामाजिक बंधुता ठेवा.. जातीजातीत तेढ निर्माण करू नका कोणाला बरं वाटू न वाटू सातारची हद्दवाढ होणारच मी विकासकामांच्या संदर्भात दिलेली कागदपत्रे काहींनी ‘डस्टबीन’मध्ये टाकली तर काहीजण रद्दी विकून आर्थिकदृष्या बळकट झाले. शहापूरची खर्चिक योजना गरजेची नव्हती साताऱ्याच्या रेल्वेस्टेशनचे डिझाईन किल्ल्यासारखे तयार होणार पोवई नाका उड्डाणपुलाचे भूमिपूजन १३ मे नंतर होणार शिवाजी संग्रहालयाचा श्रेयवाद आता थांबवा. आमची पिढी विकासकामांपासून वंचित लोकांची भावना माझ्या माध्यमातून बोलून दाखवितोय

Web Title: On one hand ... rebel statement on the other hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.