शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: बुडणाऱ्याचा शोध घेताना पट्टीचा पोहणाराच बुडाला, कोरेगावात पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 14:48 IST

मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर काही वेळातच तेही त्याच ठिकाणी बुडाले

कोरेगाव : भक्तवडी, ता. कोरेगाव येथील वसना नदीवर असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यास गेलेल्या सुरेश बंडू उगले (वय २२) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगाव येथील दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवीअप्पा (वय ५३) यांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे रवीआप्पा हे पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी यापूर्वी अनेकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले होते. त्यांच्या निधनाने कोरेगावात शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, भक्तवडी येथे वसना नदी पात्रात बंधारा असून, तेथे मोठ्याप्रमाणावर पाणीसाठा झालेला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील सुरेश उगले हा तरूण मित्रांसमवेत बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. तेथे पाण्याच्या प्रवाहात तो बुडाला. ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. मात्र मृतदेह हाती लागला नाही.

त्याचवेळी कोरेगाव पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी कोरेगाव येथील पट्टीचे पोहणारे दत्तात्रय बर्गे उर्फ रवीअप्पा यांना मोबाईलवरुन संपर्क साधला आणि मृतदेह शोधण्यासाठी बोलावून घेतले. बर्गे यांनी मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर काही वेळातच तेही त्याच ठिकाणी बुडाले. बऱ्याच वेळानंतर त्यांचा मृतदेहच बाहेर आला. त्यानंतर तरूणाचाही मृतदेह सापडला. एकाच ठिकाणी दोघांचाही मृत्यू झाल्याने कोरेगावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी बर्गे यांचा मृतदेह एका खासगी गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात आणून ठेवला आणि बर्गे कुटुंबियांना अथवा नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता निघून गेले. रुग्णालयातील महिला परिचारिकेमुळे बर्गे कुटुंबियांना घटनेची माहिती समजली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंबियांसह नागरिकांनी गर्दी केली.मृत्यूच्या चौकशीची मागणीयाप्रकरणी राहूल पुरुषोत्तम बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हा प्रकार गंभीर असून, संशयास्पद आहे. दत्तात्रय बर्गे यांच्या मृत्यूची व संशयित प्रकाराची चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणे