शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:54 IST

पाचगणी : महू धरणात दापवडी, ता. जावळी येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय ५४, वर्षे ...

ठळक मुद्देमहू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यूधरणाच्या पाण्यात आढळून आला मृतदेह

पाचगणी : महू धरणात दापवडी, ता. जावळी येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय ५४, वर्षे रा. बेलोशी, ता जावळी, हे धरणाच्या पाण्यात पाय घसरून पडले होते. आज सकाळी महाबळेश्वर टेकर्सच्या शोधपथकाच्या साह्याने शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला आहे. त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या बाबतच मेढा पोलीस स्टेशन अंकित करहर दुरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी की काल संध्याकाळी सहा च्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय वर्षे ५४, रा. बेलोशी, ता. जावळी हे महू धरणाच्या पाण्यात दापवडी, या ठिकाणी पाय घसरून पडले होते. या बाबतची फिर्याद नितीन बाळासाहेब गावडे रा. बेलोशी यांनी करहर दुरक्षेत्राला दिली त्यानुसार सोमवारी धरण परिसरात पडलेल्या ठिकाणी शोध घेण्याचा पोलीस व गावकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती.त्यानंतर शोधमोहीम करण्याकरिता पोलीस स्टेशनच्या वतीने महाबळेश्वर टेकर्स याना पाचारण करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी महाबळेश्वर टेकर्सचे शोधपथक घटना स्थळी पोहचले व त्यांनी सकाळी नऊ वाजता शोधमोहीम हाती घेतली थोड्याच वेळात पाण्यात पडलेल्या ठिकाणी महाबळेश्वर टेकर्सच्या शोधपथकाने शोध घेतला असता अथक परिश्रमानंतर मृतदेह धरणामध्ये सापडला.

यामध्ये महाबळेश्वर टेकर्सच्या अक्षय नाविलकर, अनिल केळगणे, सुनील भाटिया, जयंत बिरामने, अक्षय जाधव, सुनील कदम, सुनील वाडकर, अमित कोळी, या टेकर्सनी शोधमोहिमेत विशेष परिश्रम घेतले. त्यांस दापवाडी गावचे ग्रामस्थ, व पोलीस पाटील अनिल रांजणे, कुडाळ हद्दीतील बेलवडे गावचे पोलीस पोटील निशांत रोकडे यांनी सहकार्य केले आहे.त्यानंतर पंचनामा करून मृतदेह मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलीस स्टेशनचे सपोनि नीलकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करहर दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार शिंदे डी. जी करीत आहेत.जावळी तालुका दुर्गम असून कुडाळ व मेढा, या विभागात विभागला आहे. शवविच्छेदानाची सुविधा फक्त मेढा याच ठिकाणी उपलब्ध असल्याने नातेवाईकांची मोठी हेळसांड होते. सोमार्डी,ग्रामीण रुग्णालय किंवा कुडाळ,प्राथमिक आरोग्य केंद या पैकी एका ठिकाणी शवविच्छेदनाची सोय उपलब्ध केल्यास या विभागातील नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर