अपघातात एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST2021-02-05T09:07:03+5:302021-02-05T09:07:03+5:30

कुडाळ : आलेवाडीवरून कुडाळला जात असतानाच अरुंद रस्ता व साईडपट्टी नसल्यामुळे गाडी रस्त्यालगत घसरून झालेल्या अपघातात पांडुरंग सदाशिव पवार ...

One died on the spot in the accident | अपघातात एकाचा जागीच मृत्यू

अपघातात एकाचा जागीच मृत्यू

कुडाळ : आलेवाडीवरून कुडाळला जात असतानाच अरुंद रस्ता व साईडपट्टी नसल्यामुळे गाडी रस्त्यालगत घसरून झालेल्या अपघातात पांडुरंग सदाशिव पवार (वय ४४, रा. आलेवाडी, ता. जावळी) त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग पवार हे आलेवाडीहून दुचाकीवरून दुपारच्या सुमारास कुडाळच्या दिशेने जात होते. दरे बुद्रुक हद्दीत असताना त्यांची गाडी घसरली आणि रस्त्यावर जोरदार आपटल्याने त्यांचा डोक्याला गंभीर इजा झाली. यामध्ये डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक एम. के. कदम तपास करीत आहेत.

Web Title: One died on the spot in the accident