विकासनगर येथे एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:57+5:302021-02-07T04:35:57+5:30

सातारा : शहरालगत असणाऱ्या न्यू विकासनगर येथे एका पन्नासवर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र पवार असे आत्महत्या ...

One commits suicide at Vikasnagar | विकासनगर येथे एकाची आत्महत्या

विकासनगर येथे एकाची आत्महत्या

सातारा : शहरालगत असणाऱ्या न्यू विकासनगर येथे एका पन्नासवर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र पवार असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून आत्महत्येमागील नेमके कारण पोलिसांना समजू शकलेले नाही. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र शंकर पवार (वय ५०, रा. न्यू विकासनगर, निसर्ग बिल्डिंग, संगमनगर, खेड, सातारा) यांनी दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील बेडरुमच्या छताला सुती कासऱ्याने गळफास लावून घेतला. यानंतर त्यांना नातेवाइकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याची खबर विलास शंकर पवार (वय ६५) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दबडे-पाटील हे करत आहेत.

Web Title: One commits suicide at Vikasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.