शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सातारा: जमीन वाटपावरून वाद, ऑपरेशनच्या ब्लेडने सख्ख्या भावावर केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:16 IST

जमीन वाटून देत नसल्याचा मनात राग

सातारा : जमीन वाटपाच्या कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाल्यानंतर एका भावाने दुसऱ्या भावावर ऑपरेशनच्या ब्लेडने वार केले. यामध्ये संबंधित भाऊ जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील रेवंडी गावातील प्रवीण बबन भोसले (वय २९) हे सध्या कोंडवेतील दिव्यनगरीमध्ये वास्तव्यास आहेत. प्रवीण भोसले हे दि. १७ रोजी सकाळी पावणेआठ वाजता घरात झोपले होते. त्यावेळी त्यांचा भाऊ सचिन भोसले हा त्यांच्या घरात आला. आई-वडील रेवंडी येथील घर, जमीन वाटून देत नसल्याचा राग मनात धरून त्याने प्रवीण भोसले यांच्या दंडावर ऑपरेशनच्या ब्लेडने वार केले. यानंतर तो तेथून पसार झाला.जखमी प्रवीण भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जाबजबाब घेतला. त्यानंतर त्यांचा भाऊ सचिन भोसले याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित सचिन भोसले हा एका खासगी दवाखान्यात काम करत असून, त्याने हे ऑपरेशनचे ब्लेड दवाखान्यातून आणले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. याबाबत हवालदार आशिष कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी