वाई दारू विक्रीप्रकरणी एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:32+5:302021-05-05T05:03:32+5:30
वाई : लाखानगर वाई येथे दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या ...

वाई दारू विक्रीप्रकरणी एकजण ताब्यात
वाई : लाखानगर वाई येथे दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या युवकाकडून कारसह १ लाख १२ हजार ८४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्या युवकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखानगर येथे रस्त्याकडेला कार (एमएच १४ एक्स ०३१३) मध्ये देशीदारूची चोरटी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले. या छाप्यात देशी दारूने भरलेले पाच बॉक्स आढळून आले. त्याच्या ताब्यातील कारसह १ लाख १२ हजार ८४० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्यांच्या बॉक्ससह ऐवज हस्तगत केला. अजय किरण घाडगे (वय १९, रा. लाखानगर वाई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के हे करत आहेत.