अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:52+5:302021-02-07T04:36:52+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकाच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी ...

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी एकाला अटक
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकाच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी अवघ्या ९६ तासांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून आवळल्या आहेत. यावेळी युवकाविरुद्ध ॲट्राॅसिटी व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यांतर्गत (पोक्सो) शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन युवतीचे संबंधित मुलाबरोबरच प्रेमसंबंध जुळले होते. त्यानुसार किरण वसेकर याच्याबरोबर मोबाईलद्वारे बोलताना आढळल्याने संबंधित युवतीच्या आईने अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमधील एका गावात राहणाऱ्या बहिणीकडे दिवाळीमध्ये पाठविले होते. तरीही दोघांचे बोलणे सुरु होते. दरम्यान, २९ जानेवारी रोजी संबंधित मुलीला बहिणीच्या गावातून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन त्याला अटक केली.