चार किलो गांजासह एक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:40 IST2021-01-25T04:40:33+5:302021-01-25T04:40:33+5:30
फलटण : गांजाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी एकाला अटक केली. युवराज बाळू मोरे (रा. कुंभार गल्ली, फलटण) ...

चार किलो गांजासह एक अटकेत
फलटण : गांजाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी एकाला अटक केली. युवराज बाळू मोरे (रा. कुंभार गल्ली, फलटण) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४ किलो ६२८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फलटण शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रविवारी सकाळी लोणंद-फलटण मार्गावर असलेल्या जिंती नाक्यावर कर्तव्य बजावत होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या युवराज मोरे या तरुणावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला अडविले. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीत १२ हजार ३०० रुपये किमतीचा तब्बल ४ किलो ६२८ ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला अटक केली असून, त्याच्याकडून गांजा, दुचाकी, रोख रक्कम, मोबाइल व इतर साहित्य असा एकूण ६५ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.