शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:35 IST

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह व आमदार रामराजे एकाच व्यासपीठावर प्रथमच फलटणकराना दिसले

नसीर शिकलगारफलटण : केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या आज फलटण दौऱ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी उपस्थिती दर्शविली. मात्र विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर कार्यक्रम स्थळी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार रामराजे एकाच व्यासपीठावर प्रथमच फलटणकराना दिसले.आज, फलटण शहरांमध्ये नितीन गडकरी यांच्या सत्कार सोहळ्याचे तसेच विविध कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच वर्षानंतर नितीन गडकरी हे फलटणमध्ये आल्याने त्यांच्या दौऱ्याची विशेष चर्चा सुरू झाली. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपा बरोबरच राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात आज प्रथमच एकाच व्यासपीठावर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आ रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी उपस्थिती दर्शविल्याने फलटण शहरांमध्ये विविध चर्चाना उधाण आले.कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नेतेमंडळी उपस्थित होते. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यावर काय होणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रामराजे नाईक निंबाळकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे कार्यक्रम स्थळी येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांनी उपस्थिती दर्शवली. आज दिवसभर याच कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरNitin Gadkariनितीन गडकरी