शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गौराईच्या निमित्ताने 'त्यांना' लागली घराची ओढ!, पोलीस महिला अस्वस्थ 

By प्रगती पाटील | Updated: September 21, 2023 12:05 IST

सातारा : लाडक्या गणपती बाप्पाचे जिल्ह्यात जल्लोशी स्वागत झाले. सातारकरांना सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी राबणाऱ्या पोलिस दलातील महिलांमध्ये ...

सातारा : लाडक्या गणपती बाप्पाचे जिल्ह्यात जल्लोशी स्वागत झाले. सातारकरांना सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी राबणाऱ्या पोलिस दलातील महिलांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. पुसेसावळीत तणावाची परिस्थिती उद्भवल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित होईपर्यंत पोलिस यंत्रणा राबली. घटनेचे पडसाद गणेशोत्सवात उमटतील या शक्यतेने यंदा गणेश आगमनावारही पोलिसांची करडी नजर आहे. बंदोबस्ताच्या निमित्ताने परगावी ड्युटी लागलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आता गौरी आगमनाच्या चिंतेने भेडसावले आहे.पोलिसांना सणवार नसतो. फक्त ‘ड्युटी’ असते. सणासुदीत तर हमखास ते रस्त्यावरच असतात. कायदा, सुव्यवस्थेचा भार खांद्यावर पेलत ते कर्तव्य बजावतात. पुरूष कर्मचाऱ्यांसोबतच खांद्याला खांदा लावून महिला कर्मचाऱ्यांनाही बंदोबस्त करावा लागतो. ऐन सणावेळीच त्या बंदोबस्तात असतात. कुटूंबासमवेत सण साजरा करण्याची इच्छा असुनही कर्तव्याला प्राधान्य देत त्या ‘ड्युटी’ बजावतात.मनातील सुप्त इच्छांना मुरड घालून त्या हे कर्तव्य जबाबदारीने निभावतात. सध्याही महिला पोलिसांची तीच अवस्था आहे. गौरी, गणपती सणाला थाटात प्रारंभ झालाय. मात्र, महिला पोलीस कर्तव्यावर आहेत. मंगळवारी गणपतीचे घरोघरी आगमन झाले. गुरूवारी सोनपावलांनी गौराईही घरोघरी आगमन करेल. मात्र, गौराईच्या सणाला तरी बंदोबस्तातून सवलत मिळेल का, अशी चलबिचल त्यांच्यात सुरू झाली आहे.

गणपती आणले, गौरी कशी येईल?पुसेसावळीतील तणाव निवळण्यासाठी पोलीस यंत्रणेने दिवसरात्र एक केले. या तणावाचे पडसाद गणेशोत्सवावर उमटू नयेत म्हणून गणपती आगमनादिवशी पै पाहुणे, शेजारी नातेवाईक, मित्र यांच्या मदतीने गणपती बाप्पा पोलिसांच्या घरी विराजमान झाले. पण गौरी आगमन सोहळा कुटूंबातील महिलेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गौरीसाठी आवश्यक असणा-या पुजेपासून सर्वच गोष्टींसाठी घरातील महिलाच लागते. पण बंदोबस्ताच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब गेलेल्या कर्मचारी भगिनी गौराई घरी कशी आणायची या पेचात आहेत.

या कारणांनी विस्कटली घडी!गत सप्ताहात पुसेसावळीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर राहिली. आॅगस्टच्या दुस-या आठवड्यात व्हायरल झालेल्या पोस्टमुळे शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. पोलिस यंत्रणांनी यातील दोषी पकडल्यानंतर यंत्रणा उसंत घेणार तोच पुसेसावळीमध्ये तणाव निर्माण झाला. गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेला हाय अर्लटवर रहावे लागले. जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी पोलीसांची वाढीव कुमक पाठवावी लागल्याने यंदा पोलीस बंदोबस्ताची घडी विस्कटली आहे.

पोलिस भगिनींचा जीव कासावीसपोलिस कर्मचाऱ्यांबरोबर महिला कर्मचारीही बंदोबस्तावर आहेत. आवश्यकतेनुसार त्यांना वेगवेगळ्या शहरात नेमणूक मिळाली आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरू झालेला बंदोबस्त रात्री उशिरा शिथिल होतो. मग गौराईसाठी घरी जायचे कधी, अन् कसं याचं उत्तर त्यांना मिळेना. गवराईची काहीच पूर्वतयारी झाली नसल्याने या पोलिस भगिनींचा जीव कासावीस झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanesh Mahotsavगणेशोत्सव