शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीदिनी सातारा जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी किल्ले प्रतापगडावर जाणार, विविध कार्यक्रम होणार 

By नितीन काळेल | Updated: February 18, 2025 19:33 IST

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी किल्ले प्रतापगडावर जाण्याची परंपरा कायम असून यंदाही ...

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी किल्ले प्रतापगडावर जाण्याची परंपरा कायम असून यंदाही १९ फेब्रुवारीला अधिकारी जाणार आहेत. यानिमित्ताने प्रतापगडावर श्री भवानीमाता महापूजा, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभाही होणार आहे.जिल्हा परिषदेच्यावतीने शिवजयंतीचा कार्यक्रम महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर करण्यात येतो. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा पडलेली आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी जातात. पण, सुमारे तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट आहे. यामुळे अधिकारीच प्रतापगडावर जाऊन विविध कार्यक्रम पार पडतात. यावर्षीही जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रतापगडावर जाणार आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत.बुधवार, दि. १९ रोजी सकाळी सात वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते श्री भवानीमातेस अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर महापूजा होणार आहे. साडे नऊ वाजता कुंभरोशीचे सरपंच यांच्या हस्ते श्री भवानीमाता मंदिरासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. याचवेळी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ पूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम याशनी नागराजन यांच्या हस्ते होईल. दहा वाजता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचे तसेच पोवाडा गायन आणि शालेय विद्याऱ्श्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी १२ वाजता किल्ले प्रतापगडावरच जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा होणार आहे. या सभेलाही सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदPratapgad Fortप्रतापगड किल्लाShivjayantiशिवजयंती