शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन.. मिटलं टेन्शन; शासनस्तरावर सकारात्मक चर्चा, साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

By नितीन काळेल | Updated: March 20, 2023 18:34 IST

संपकाळात कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर...

सातारा : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी संपावर गेले होते. मात्र, संपाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी कामावर येणार आहेत. तर साताऱ्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मागण्यांचा विचार झाल्याने एकच जल्लोष केला.राज्यात २००५ च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र, त्यांच्या पदरी काहीच पडले नव्हते. तसेच वेतनातील त्रुटीचाही मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे जुनी पेन्शन सुरू करणे, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे आणि सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, समान काम आणि समान पदोन्नती टप्पे, बदल्यांतील अन्यायकारक धोरण रद्द करणे, सुधारित आकृतिबंधात लिपिकांची पदे वाढविणे आदी मागण्याांसाठी संप सुरु करण्यात आला होता.मागील मंगळवारपासून संप सुरू झाला होता. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर पाच हजार कर्मचारी कामावर होते. संप सुरु झाल्यापासून कर्मचारी आक्रमक झाले होते. तसेच दररोज निदर्शने, विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत होती. याची तीव्रता वाढत चाललेली. असे असतानाच सोमवारी संपाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयानंतर सातारा जिल्हा परिषदे वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच जुन्या पेन्शनबाबत विचार झाल्याबद्दल जल्लोष केला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संप मागे घेतल्याने मंगळवारपासून कर्मचारी कामावर येणार आहेत.

चार दिवस कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर...जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर होते. त्यावेळी अधिकारीच फक्त जिल्हा परिषदेत कार्यरत होते. तर जिल्हा परिषदेत कामावर येणाऱ्या लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध विभागाची जबाबदारी दिली होती. संबंधितांनी चार दिवस कामकाज पाहिले. तसेच अधिकाऱ्यांशी समन्वय साधत कामे केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन