पोलिसात तक्रार दिल्याने वृद्धाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:43+5:302021-09-07T04:47:43+5:30

सातारा : ‘माझी व माझ्या पत्नीची तुझ्या बायकोने पोलिसात तक्रार का केली,’ असे विचारत एका ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण ...

The old man was beaten after he lodged a complaint with the police | पोलिसात तक्रार दिल्याने वृद्धाला मारहाण

पोलिसात तक्रार दिल्याने वृद्धाला मारहाण

सातारा : ‘माझी व माझ्या पत्नीची तुझ्या बायकोने पोलिसात तक्रार का केली,’ असे विचारत एका ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दिलीप विष्णू माने, कांचन दिलीप माने (रा. मानेवाडी कुकुडवाड, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार भिकू विष्णू माने (वय ६५, रा. मानेवाडी कुकुडवाड, ता. माण) यांच्याजवळ येऊन दिलीप माने म्हणाला, माझी व माझ्या पत्नीची तुझ्या बायकोने पोलिसात तक्रार का केली, असे विचारत डोक्यात काठी मारली. तसेच काठीने पाठीवर, गुडघ्यावरही मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा सचिन यालाही संबंधितांनी मारहाण केली. या प्रकारानंतर भिकू माने यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास डी.बी. कारंडे हे करत आहेत.

Web Title: The old man was beaten after he lodged a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.